नवोदय विद्यालय दहावीचा निकाल १०० टक्के: विशेष प्राविण्यासह ७२ विद्यार्थी उत्तीर्ण
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड नवी दिल्ली यांचे वतीने मार्च २०२०मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर ता. मोहोळ सोलापूरचा इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल लागला असून गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे.
विद्यालयात कु.
सौंदर्या हरकुड हिने ९६.८०टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या परीक्षेसाठी एकुण ७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यांपैकी ७२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर ३१ विद्यार्थी ९० टक्केपेक्षा जादा गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे.कु. साक्षी देशमुख ९६.२०टक्के गुण संपादन करुन द्वितीय आली आहे.तर कु. अनुजा मलशेट्टी, संग्राम माळी,ओंकार डोलारे यांनी ९५.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. विद्यालयात गणित विषयात सहा व मराठी विषयात नऊ विद्यार्थ्यांनी १००पैकी
१०० गुण मिळवून बाजी मारली आहे. प्राचार्य डाँ.अंकुश सावंत यांचे मार्गदर्शन व परिश्रम यामुळे आम्ही विशेष गुणवत्तेत
उत्तीर्ण झालो आहोत असे विद्यार्थ्यांनी मनोदय व्यक्त केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जवाहर नवोदय विद्यालय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डांँ.
मिलिंद शंभरकर, प्राचार्य.डाँ अंकुश सावंत, उपप्राचार्य प्रदीप वाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
0 Comments