कोरोनाची पुन्हा एकदा घेरडी कडे धाव, मुंबई हुन आलेला एक जण कोरोना पॉझिटिव्ह
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुक्यातील मौजे वाकी घेरडी या गावातील एक इसम कळंबोली मुंबई येथून 3/7/2020 रोजी गावात आलेला होता. त्यास अलहिदा मुंबई येथे उपचार चालू होते. त्यामुळे त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. इसमाची सदर कोरोना चाचणी घेण्यात आली. सदर अहवालामध्ये संबंधित इसम कोरोना पाॅझिटिव्ह आढळला आहे.
त्यास पुढील उपचाराकरिता सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे. संबंधित इसमाच्या जास्त संपर्कात असलेल्या वाकी घेरडी येथील अन्य ५ लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.त्यांना कोणताही त्रास होत नसून सर्वांची प्रकृती स्थिर व्यवस्थित आहे. उद्या त्यांचे नमुने घेण्यात येणार आहेत, तसेच तेथे त्यांचे कोरोना विषयक नमुने घेऊन पुढील उपचार केले जाणार आहेत. सर्व संबंधितांवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे.
0 Comments