घाटशिळ घाटात दारुचा ट्रक पलटुन चालक ठार
तुळजापूर दि.२९(क.वृ.):- तुळजापूर येथील घाटशिळ घाटात दारु वाहतुक करणारा ट्रक पलटी होवुन झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला .हा अपघात घाटशिळ घाटात एस वळणावर घडला. हा अपघात बुधवार दि. २९ रोजी सकाळी दहा वाजता घडला
सदरील ट्रक चालक गाडीत अडकताच त्याला वाचविण्यासाठी चाळीस ते पन्नास पोलिस घटनास्थळी तातडीने गेले होते त्याला वाचविण्यासाठी पोलिसांनी टेम्पोला दोर लावुन प्रचंड अथक प्रयत्न केले माञ दहा टायर ट्रक व त्यात दारु माल असल्याने ट्रक मध्ये प्रचंड वजन असल्याने अखेर चालकास बाहेर काढता न आल्याने अर्धा तासाचा अथक प्रयत्न नंतर त्याचा जीव गेला अखेर क्रेन आल्यानंतर त्याचा मृतदेह काढता आला .
या बाबतीत अधिक माहीतीअशीकी नांदेड येथुन दारु भरुन ट्रक क्रमांक MH12KP9696 नांदेड येथुन तुळजापूर मार्ग सोलापूर कडे जाताना एस वळणावर वेगात असलेली गाडी वळणावर असलेल्या कठड्याला थडकल्याने पलटी होवुन यात केबिन चालक सीटवर चालक अडकल्याने जागीच ठार झाला आतील दारु माञ या अपघतातुन वाचली गाडीचे माञ मोठे नुकसान झाले
यावेळी पोनि हर्षवर्धन गवळी सपोनी राठोड सपोनी रमाकांत शिंदे पोहेका चालक आर एन शिंदे सुडके सह पोलिस उपस्थितीत होते.
0 Comments