लऊळ गावात आढळले कोरोनाचे दोन रुग्ण,सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणे फावले
लऊळ दि.२९(क.वृ.):लऊळ ता.माढा येथे दोन व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्यात एक पुरुष एका महिलेचा समावेश आहे. माढा तालुक्यातील कोरोनाची एन्ट्री दोन महिन्यांपूर्वी लऊळ गावामधूनच झाली होती.असे असताना गावातील नागरिक शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत होते.परंतु आज दोन व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लऊळकरांचे धाबे दणाणले आहेत.या दोन्ही पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २५ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेतले असून सदर परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून प्रशासनाने सील केला आहे.
0 Comments