रणरागिणी महिला कॉन्स्टेबलने कोरोनाला हरवले
अकलूज(विलास गायकवाड)- पुणे डेक्कन पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल माधुरी कुंभारने कोरोनावर मात केल्याने पोलिस प्रशासनाकडून माधुरी कुंभार यांचेवरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. माधुरी कुंभार या अकलूज येथील जनसेवा संघटनेच्या कार्यकर्त्या जोतीताई कुंभार यांची भाजी आहे.
महाभयानक आशा प्राणघातक कोरोना सारख्या क्रूर विषाणूने जगाच्या पाठीवर थैमान घातले असून, त्याने कित्येकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. आपल्याकडे कोरोनारूपी राक्षसाचा शिरकाव पाहता! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असले तरी आपले शासन, प्रशासन,डॉक्टर यंत्रणा, पोलिस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा स्वतःचा जीव धोक्यात घालून खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभे राहत सर्वप्रकारे जनतेला मदतीचा हात देत आहेत.
सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याशी बांधील राहून आपली पोलिस यंत्रणा जीवाची बाजी लावून, कधी रणरणत्या उन्हात प्रखर दाहकतेचा सामना करीत कर्तव्य बजावत आहेत तर कधी महाचक्रीवादळाला सामोरे जात कर्तव्य पार पाडत आहेत. तर कधी तुफानी पावसात जीवाची पर्वा न करता कर्तव्याशी एकनिष्ठ राहत आहेत. कोरोनाशी लढा देत असताना आसमानी संकटाचाही सामना करीत आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. रणरागिणी महिला पोलिस कॉन्स्टेबल माधुरी कुंभार या कोरोनाच्या महामारीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरचे कोरोनाने केव्हा आक्रमण केले हे त्यांनाही समजले नाही? अशातच त्यांनी खंबीरपणे न डगमगता.!कोरोनाचा सामना करीत कोरोनावर मात केली.
0 Comments