Hot Posts

6/recent/ticker-posts

घेरडीत सलग दुसऱ्या दिवशी एक महिला पॉझिटिव्ह,आरोग्य विभागामार्फत २१४ जणांची रॅपीड अँटीजन टेस्ट

घेरडीत सलग दुसऱ्या दिवशी एक महिला पॉझिटिव्ह,आरोग्य विभागामार्फत २१४ जणांची आज घेतली रॅपीड अँटीजन टेस्ट


सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुक्यांतील ग्रामीण भागामध्ये आज कोळा, महूद, घेरडी व किडेबिसरी या गावांमध्ये एकूण 113 टेस्ट घेण्यात आल्या, त्यामध्ये मौजे घेरडी येथे एक महिला कोरोना बाधित आढळून आलेली आहे. सदर महिलेची प्रकृती स्थिर आहे. तर उर्वरित सर्व टेस्ट निगेटिव्ह आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
   तर सांगोला शहरांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या एकूण 101 लोकांची टेस्ट करण्यात आली त्यामध्ये एकही व्यक्ती पॉझिटिव आढळून आला नाही ,अशा प्रकारे आज एकूण 214 व्यक्तींची कोरोना बाबतची रॅपिड ॲंटिजन तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एकूण एक महिला पॉझिटिव्ह आढळून आलेली आहे. वरील कोरोनाबाधित महिलेचे प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे विलगीकरण करण्यात आले असून त्यांचे निकट संपर्कात (high risk contacts) आणि (low risk contacts) असलेल्या व्यक्तींची माहिती घेणेचे काम सुरू आहे.
         घेरडी येथे सलग दोन दिवस रुग्ण सापडल्यामुळे गावठाणाचा भाग हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच मौजे घेरडी येथे गावठाणाच्या हद्दीत आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात येईल. सांगोला येथे वैदयकीय सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत सुरु करणेत आलेले आहे. आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती   उप विभागीय अधिकारी श्री. उदयसिंह भोसले यांनी दिली .
Reactions

Post a Comment

0 Comments