अकलूज( प्रतिनिधी) देशात कोराना विषाणूचा प्रार्दुभाव वाढलेला आहे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली किसान क्रेडीट कार्डाची योजना कार्यरत आहे. दूध उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतक-याला खेळते भांडवली कर्ज उपलब्ध होते.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या शेतकरी हीताच्या योजनेचा फायदा दूध उत्पादक शेतक-यांना व्हावा म्हणून शिवामृत दूध संघाच्या माध्यमातून ही योजना माळशिरस तालुक्यात प्रभावीपणे राबविण्याचे धोरण ठरविले आहे असे शिवामृत दूध संघाचे चेअरमन व भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या योजने अंतर्गत दूध उत्पादकांना व्यवसाय करताना जनावरे निरोगी राहून त्यापासून चांगले गुणप्रतीचे दूध पुरवठा करणेसाठी आवश्यक असणारे पशूखादय, चारा खरेदी, औषध उपचारासाठी व इतर खर्चासाठी मदत व्हावी या हेतूने ही योजना राबविणेत येणार आहे. या सदर योजनेसाठी किसान क्रेडीट फॉर्म भरुन त्यासोबत आधार कार्ड, ७/१२, ८ अ खाते उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, दोन फोटो शिवामृत संघाकडे दि.२७/०७/२०२० पर्यंत जमा करावेत.
किसान क्रेडिट कार्ड फॉर्म शिवामृत संघाचे www.shivamrut.com या वेबसाईटवर व शिवामृतच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असून सदर योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी घ्यावा असे आवाहन ही धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले. यावेळी व्हा.चेअरमन सावता ढोपे, कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख, सेक्रेटरी प्रदिप पवार यांच्यासह संचालक व अधिकारी उपस्थित होते.
0 Comments