Hot Posts

6/recent/ticker-posts

परिक्षाकेंद्र बदलण्यासाठी संधी द्या

परिक्षाकेंद्र बदलण्यासाठी संधी द्या


तुळजापूर दि.११(क.वृ.):- यु पी एस सी च्या धर्तीवर राज्य सेवा पुर्व व संयुक्त पुर्व परिक्षेचे केंद्र बदलण्याची संधी मिळण्याची मागणी उस्मानाबाद कळंब मतदार संघाचे  शिवसेनेचे कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे पञ देवुन केली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पञात म्हटलं आहे की :
"कोविड19च्या संभाव्य धोक्यामुळे05/042020रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच आयोगाच्या अन्य परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेल्या होत्या."
दरम्यान लोकडाऊनच्या काळात पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई यासारख्या अन्य शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे परीक्षार्थी आपापल्या गावी गेले आहेत. रेड झोन असलेल्या पुणे या ठिकाणी4000परीक्षार्थीनी
परीक्षा केंद्राची निवड केली आहे त्यापैकी90%परीक्षार्थी हे दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत व सध्या ते आपापल्या जिल्ह्यामध्ये आहेत.नवीन जाहीर वेळापत्रकाप्रमाणे परीक्षार्थी परीक्षेसाठी शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात येणार आहेत व परीक्षा झाल्यानंतर ते मूळ जिल्ह्याच्या ठिकाणी जातील त्यामुळे संक्रमण वाढीचा धोका संभवतो. या सर्व गोष्टींचा विचार आयोगाने करून UPSC ने जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परीक्षार्थींना आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र बदलून द्यावे व यासाठी आयोगाने आपले संकेत स्थळ 7 दिवसासाठी खुले करून उमेदवारांना आपले परीक्षा केंद्र बदलण्याची संधी द्यावी.असे म्हटलं आहे. 
Reactions

Post a Comment

0 Comments