सिव्हिल हॉस्पिटल मध्ये लवकरचआणखी शंभर बेड उपलब्ध होणार
सोलापूर, दि.१०(क.वृ.): श्री शिवाजी छत्रपती सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे 100 बेडचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येत्या दहा दिवसात सुरु केले जाईल, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
पालकमंत्री भरणे यांनी आज सिव्हिल हॉस्पिटल येथे बी वॉर्डला भेट देवून पाहणी केली. तेथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विकसित करण्यात येणाऱ्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर ,मनपा आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदि उपस्थित होते.
अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी कोविड हॉस्पिटल बाबत कसे नियोजन करण्यात येत आहे याची माहिती पालकमंत्री भरणे यांना दिली. यावेळी डॉ.प्रसाद, डॉ.पुष्पा अगरवाल, डॉ.डावखर आदि उपस्थित होते.
0 Comments