Hot Posts

6/recent/ticker-posts

लोटेवाडी ग्रामपंचायतीची अवस्था झाली अडगळीच्या खोलीसारखी ना सरपंचाचे लक्ष ना ग्रामसेवकांचे !

लोटेवाडी ग्रामपंचायतीची अवस्था झाली अडगळीच्या खोलीसारखी ना सरपंचाचे लक्ष ना ग्रामसेवकांचे !


सांगोला दि.२५(क.वृ.): सांगोला तालुक्यातील राजकीय आणि धार्मिक दृष्टया महत्वाची असणारी ग्रामपंचायत म्हणजे लोटेवाडी ग्रामपंचायत होय.संपूर्ण गावचा कारभार सांभाळणाऱ्या ग्रामपंचायतीची अवस्था अगदी अडगळीच्या खोली सारखी झालेली दिसत आहे. म्हसोबा देवाचे जागृत देवस्थान ही संपूर्ण महाराष्ट्राला ओळख असलेल्या लोटेवाडी गावात गावचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयावर ग्रामपंचायतीचे सुस्पष्ट अक्षरात नाव लिहलेले दिसत नाही."इथेच आहे,पण दिसत नाही"अशी अवस्था या ग्रामपंचायतीची झालेली दिसत आहे.
सरकारी पाहुणा किंवा अन्य कोणी गावात आला तर त्याला विचारूनच ग्रामपंचायत कार्यालयाकडे जावे लागते आहे.जुन्या हायस्कुल जवळ ग्रामपंचायत कार्यालय आहे,एवढीच काय ती ओळख.पण तिथे ही गेले  तर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गवत वाढलेले दिसून येत आहे. जन्म मृत्यु,विवाहाची नोंद करण्यासाठी,ग्रामपंचायत कर भरण्यासाठी नागरिक येतात. बरेच जण लॉक डाऊन च्या काळात कित्येक वर्षांनी गावात आल्यानंतर त्यांना ही ग्रामपंचायत कार्यालय कुठे आहे?असे विचारून जावे लागत आहे. कारण जि प च्या शाळेजवळ असणारे नवीन ग्रामपंचायत कार्यालय जुन्या हायस्कुल जवळ स्थलांतर केल्यामुळे या अडचणी येत असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
नेहमी विकासाच्या आणाभाका आणि गप्पा मारणाऱ्या ग्रामपंचायत सरपंचांना आणि प्रशासकीय कारभार चालविणाऱ्या ग्रामसेवकांना मात्र याचे सोयर सुतक नसल्याचे अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी सांगितले. येणाऱ्या काळात तरी किमान "ग्रामपंचायत कार्यालय लोटेवाडी"असे शीर्षक ग्रामपंचायत कार्यालयावर दिसेल,अशी अपेक्षा सुजाण ग्रामस्थ करीत आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments