Hot Posts

6/recent/ticker-posts

टाळेबंदीतील वीज बिल माफ करण्याची एमआयएमची मागणी

   टाळेबंदीतील वीज बिल माफ करण्याची एमआयएमची मागणी
अकलूज(प्रतिनिधी) राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून १८ मार्च पासून लाॅकडाऊन घोषीत करण्यात आले होते. यामुळे सर्वांचेच उदरनिर्वाह साधन, रोजगार ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने सरसकट वीजबील माफ करावे या मागणीसाठी  माळशिरस तालुका एमआयएम पक्षाच्यावतीने  कार्यकारी अभियंता जाधव यांना निवेदन देण्यात आले. 
एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर खा. असदुद्दीन औवेसी,प्रदेशाध्यक्ष खा.इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ.गफ्फार कादरी यांच्या आदेशानुसार राज्यात एम.आय.एम पक्ष वीजबील माफीसाठी मैदानात उतरली आहे.  राज्यातील आजची परिस्थिती पाहता सामान्य जनतेच्या हाताला काम आणि रोजगार नसल्याने सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. राज्यात महामारी बरोबर उपासमारीची वाईट वेळ जनतेवर ओढवली आहे. त्यातच खासगी बॅंका,मायक्रोफायनान्स,बचटगट अशा आर्थिक पतपुरवठा करणारे बॅंकांचा हप्ता ऑगस्टमध्ये  सामान्यांसाठी भरणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ मात्र आली आहे.  एकीकडे मागिल चार ते पाच महिन्याचे हप्ते व दुसरीकडे वीज वितरण कंपनीचा बोजवारा यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात नैसर्गिक आपत्तीत व आर्थिक संकटात भरडले गेलेल्या जनतेच्या भावना समजून घेत राज्यातील जनतेला दिलासा देणारा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने घेवून "राज्य कोरोनामुक्त करण्याबरोबर वीजबील मुक्त करावे "अशा विविध मागण्या एम.आय.एम. पक्षाकडून  करण्यात आले आहे. यावेळी एम.आय.एम. तालुकाध्यक्ष मोहसिन शेख, शहर उपाध्यक्ष फारूख शेख, संघटक इन्नूस बाबा सय्यद, समीर काझी,वसिम पटेल, शाहरूख शेख आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments