Hot Posts

6/recent/ticker-posts

निसर्ग चक्रीवादळ, मान्सून, पुनर्वसन व कोरोना संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला आढावा

निसर्ग चक्रीवादळ, मान्सून, पुनर्वसन व कोरोना संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला आढावा


पुणे दि.२(क.वृ.): मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निसर्ग चक्रीवादळ, मान्सून, पुनर्वसनाशी निगडीत प्रश्न तसेच प्रकल्पामुळे प्रलंबित असलेल्या विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला. पुणे जिल्ह्यातील मदत व पुनर्वसन विषयक सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे सांगितले.  प्रकल्पनिहाय प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व मान्सून तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, सामाजिक कार्यकर्ते अतुल लोंढे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, पुणे शहरी तसेच ग्रामीण भागात ज्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणी अधिक दक्षतेने उपाय योजना करा. तसेच संभाव्य दरड प्रवण गावांच्या पुनर्वसनाबाबतही शासन स्तरावरून प्राधान्याने निर्णय घेण्यात येईल. पुणे जिल्ह्यातील अनेक वर्षापासून प्रलंबित प्रकल्पाबाबतच्या अडचणी मार्गी लावण्यासाठी प्रकल्पनिहाय आढावा घेण्याच्या सूना देताना मंत्रालय स्तरावर यासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रामुळे शेती तसेच शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या. धरणातील पाणीसाठा स्थिती, शहरी तसेच ग्रामीण भागात घडू शकणाऱ्या घटना, पेरणी स्थिती, कोरोना उपाययोजना यासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच मान्सून तयारी व कोरोना विषयक उपाययोजनाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी धरणनिहाय पाणीसाठा तसेच प्रकल्पाबाबतची तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल यांनी  तालुकानिहाय खरीप पेरणी स्थितीबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments