Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला तालुक्यातील निजामपूर येथे आज आढळले पाच कोरोना पॉझिटिव्ह,एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाचा विळखा

सांगोला तालुक्यातील निजामपूर येथे आज आढळले पाच कोरोना पॉझिटिव्ह,एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाचा विळखा


सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुक्यांमध्ये आज रोजी ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा कहर सुरूच असून कोरोना बाधिताच्या संपर्कात असलेल्या एकूण 5 व शहरी भागांमध्ये कोरोना बाधिताच्या संपर्कात 67 अशा एकूण 72 व्यक्तींच्या रॅपिड ॲंटिजन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये सांगोला नगरपरिषद हद्दीमध्ये असणाऱ्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या मौजे निजामपूर ता--सांगोला  येथील एका रुग्णाची व त्याच्या वडिलांची रॅपिड ॲंटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. वरील कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात असलेल्या निजामपूर येथील आणखी 3 रूग्णांची रॅपिड ॲंटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सदर रूग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे विलगीकरण करण्याचे काम सुरू असून त्यांचे निकट संपर्कात (high risk contacts) आणि (low risk contacts) असलेल्या व्यक्तींची माहिती घेणेचे काम सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.
            निजामपूर ता -सांगोला येथे संबंधित रूग्णांचे वास्तव्य असलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तसेच मौजे निजामपूर येथे प्रतिबंधित क्षेत्रात आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात येईल,असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर सांगोला व मौजे घेरडी येथे वैदयकीय सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे. असे आवाहन उप विभागीय अधिकारी श्री. उदयसिंह भोसले आणि तहसिलदार योगेश खरमाटे यांनी सांगितले .
Reactions

Post a Comment

0 Comments