बकरी ईदची नमाजघरीच अदा करावीजिल्हा प्रशासनाचे आवाहन
सोलापूर,दि.३०(क.वृ.): कोरोना विषाणूमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यानुसार नागरिकांनी बकरी ईद नमाज घरीच अदा करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
याबाबत राज्य शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. तसेच कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांनी केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे नमूद केले आहे.
या कालावधीत सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील, जनावरे ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीद्वारे नोंदणी करुन खरेदी करावीत. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईदनिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही, असे मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहेत.
0 Comments