सामाजिक कार्यात युवा सेना नेहमीच अग्रेसर राहील-गुंडा खटकाळे
गुंडा दादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त 225 रक्तदात्यानी केले रक्तदान
सांगोला( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत युवा नेते आदित्य ठाकरे व सांगोल्याचे युवा नेते दीपक उर्फ गुंडा दादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सांगोला तालुक्याचे आमदार एडवोकेट शहाजीबापू पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी गुंडा दादा खटकाळे मित्र परिवाराचे सर्व सदस्य शिवसेना युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवासेनेच्या व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच इतर मान्यवरांनी देखील उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. अनेक युवकांनी रक्तदान करून एक प्रकारे सामाजिक संदेश देण्याचे काम केले आहे. हे रक्तदान शिबिर शिवसेना युवासेना सांगोला व गुंडा दादा खटकाळे मित्रपरिवार,सांगोला यांच्यावतीने आयोजित केले होते.या रक्तदान शिबिरामुळे शिवसेना सांगोला युवासेना सांगोला व गुंडा दादा खटकाळे मित्र परिवार यांचे सांगोला तालुक्यात कौतुक केले जात आहे
या रक्तदान शिबिरास उद्योगपती संजय (भाऊ) चव्हाण, माळशिरस तालुक्याचे युवा सेना तालुकाध्यक्ष बाबा जाधव, युवा नेते अक्षय मोरे,प्रा संजय देशमुख, रफिक नदाफ,दादा लवटे,युवा नेते नवनाथ खटकाळे,उद्योगपती योगेश खटकाळे,युवा नेते अनिल पाटील,संतोष शिंदे,डॉ नवनाथ मिसाळ,नितीन सूर्यवंशी,प्रशांत जाधव,निलेश जाधव,विजय जाधव,अवि पवार,अजित साळवे,गनिम नदाफ,सचिन जाधव,सोमनाथ जाधव,अजित जाधव,संभाजी ढेंबरे,अभिजित शिंदे,सचिन भाऊ जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.सदर रक्तदान शिबिरास रेवनिल ब्लड बँकेचे सोमेश यावलकर यांचे सहकार्य लाभले.
0 Comments