जिल्ह्यांत “राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियान” राबविणार
सोलापूर (क.वृ.):-देशाचे नेते व राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार, प्रदेशांध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्यासह जिल्ह्यातील जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यांमध्ये “राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियान” राबविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, शहर अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिली.
ते शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या अभियानाविषयी माहिती देताना म्हणाले की, या अभियाना अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यांतील गाव स्तरापर्यंतच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून http://bit.ly/RashtravadiPakshAbhipraay या ॲानलाईन लिंकद्वारे,थेट मोबाईल फोनवरून ॲानलाईन फिडबॅक फाॅर्म भरून घेतला जाणार आहे.ॲानलाईन फाॅर्म भरणा-या कार्यकर्त्याने,सदर फाॅर्ममध्ये विचारलेली माहीती (कुठलाही पर्याय रिक्त न ठेवता) टाईप करून सबमिट करावयाची आहे.
या अभियानातून काय उद्दिष्ट साध्य होणार असल्याचे सांगताना पाटील पुढे म्हणाले, तालुका निहाय सार्वजनिक प्रश्न समजून घेणे. तालुका निहाय संघटनात्मक कामाची सत्य परिस्थिती जाणून घेणे. कोविड -१९ चे संक्रमण नियंत्रित करण्यासाठी काही कल्पक व उपक्रमशिल सूचना जाणून घेणे. तालुक्यातील प्रलंबित जलसिंचन व इतर विकास कामांची माहिती घेणे. कार्यकर्त्याच्या अभिप्रायाच्या आधारे भविष्यकाळातील संघटनात्मक सुधारणा करणे तसेच तालुका निहाय विकास कामांचा अजेंडा निश्चित करणे.
सदर अभियान “ॲानलाईन पद्धतीने फिडबॅक फाॅर्म भरून देणे” या स्वरूपाचे असल्याने सर्वात प्रथम पक्षाच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांपर्यंत सदर फिडबॅक फाॅर्मची ॲानलाईन लिंक http://bit.ly/RashtravadiPakshAbhipraay मेसेज द्वारे पाठवली जाईल. सदर लिंक काॅपी पेस्ट करून प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्याने त्याच्या किमान १०० सहका-यांना पाठवायची आहे व त्या १०० कार्यकर्त्यांनी सदर “ॲानलाईन फिडबॅक फाॅर्म” भरून सबमिट केला असल्याची खात्री करावयाची आहे. 3. सदर अभियानाची सविस्तर माहिती देण्याकरिता तथा अभियानाच्या प्रभावी अंमबजावणीसाठी थेट जि.प.स्तरावरील कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष बैठक घेऊन (सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून),उपस्थित कार्यकर्त्यांकडून “राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानाची” प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे तथा प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. या अभियानाची अंमलबजावणी कार्यकर्त्यांनी करणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकारी जिल्हाध्यक्ष या नात्याने मी स्वतः संपूर्ण जिल्ह्याचा जिल्हापरिषद गट निहाय दौरा करणार आहे.या दौऱ्यामध्ये माझ्या सोबत युवक जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष, युवती जिल्हाध्यक्ष, ओ.बी.सी.जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या इतर सेलच्या अध्यक्षांनी सहभागी व्हावयाचे आहे.पक्षाच्या तालुका अध्यक्षांना त्यांच्या तालुक्याची दौऱ्याची तारीख कळवली जाईल. त्याप्रमाणे तालुका अध्यक्षांनी ऐका दिवसात 6 ते 7 जिल्हा परिषद गटांच्या दौऱ्याचे नियोजन तयार करावयाचे आहे.
युवक,महिला व इतर सेलच्या जिल्हाध्यक्षांनी आपापल्या तालुका अध्यक्षांना देखील सूचना करून,वरील प्रमाणे जि.प. गट निहाय बैठकांना आपापल्या सेलचे कार्यकर्ते उपस्थित राहतील याची काळजी घ्यावयाची आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातून कमीतकमी ५००० “ॲानलाईन फिडबॅक फाॅर्म” भरून प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे युवक शहर अध्यक्ष जुबेर बागवान, महीला अध्यक्ष नलवडे व कार्यकर्त्ये उपस्थित होते.
0 Comments