Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राच्या लाडक्या 'पु.लं.'ना विनम्र अभिवादन… -अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

महाराष्ट्राच्या लाडक्या 'पु.लं.'ना विनम्र अभिवादन
-अजित पवारउपमुख्यमंत्रीमहाराष्ट्र राज्य.

   

मुंबई दि. ११ :  पु.ल’ स्पर्श होताचदुःखे पळालीनवा सूरआनंदयात्रा मिळालीनिराशेतून माणसे मुक्त झालीजगू लागलीहास्यगंगेत न्हाली… असं ज्यांचं वर्णन कवीवर्य मंगेश पाडगावकरांनी केलं ते आनंदयात्री पु.ल.देशपांडे अर्थात लाडक्या भाईंचा आज स्मृतीदिन.
भाईंनी त्यांच्या बहुरंगीबहुढंगी व्यक्तिमत्वानं महाराष्ट्र हसवलाहसता ठेवला अन् घडवला देखिल. भाईंनी साहित्य व कलेच्या प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी केली व रसिकांना मनमुराद आनंद दिला. माणुसकीचा आदर्श निर्माण केला. नैतिकतादातृत्वाच्या बाबतीतही ते श्रेष्ठ ठरले. मराठी भाषामराठी माणूसमहाराष्ट्रावर त्यांनी भरभरुनं प्रेम केलं. महाराष्ट्राचा गौरव वाढवला.
 पु.ल.नी महाराष्ट्र कायम हसता ठेवलापुढेही ठेवत राहतील. असे पु.ल.’ पुन्हा होणे नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments