विडी घरकुल परिसराचे पोलीसांच्यावतीने निर्जंतुकीकरण
सोलापूर (क.वृ) – विडी घरकुल परिसराचे दररोज ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याची माहिती, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.
शहरानजिक असलेल्या विडी घरकुल परिसरात दाट लोकवस्ती आहे. या परिसरात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने खास वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे. या वाहनाची निर्मिती पोलीसांच्या मोटर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. या वाहनांच्या माध्यमातून विडी घरकुल परिसरात सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने निधी देण्यात आला. या वाहनांच्या निर्मितीसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपअधिक्षक अरुण सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. पोलीस दलाच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments