Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस तालुक्यासाठी तात्काळ मेडीकल व पॅरामेडीकल स्टाफ उपलब्ध करून द्यावा - धैर्यशील मोहिते-पाटील

माळशिरस तालुक्यासाठी तात्काळ मेडीकल व पॅरामेडीकल स्टाफ उपलब्ध करून द्यावा - धैर्यशील मोहिते-पाटील

जिल्हा चिकित्सक व प्रशासनास  मागणी वजा इशारा



अकलूज (क.वृ)-  सोलापूर शहरा सह जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे.माळशिरस तालुक्यात आजतागायत ४  कोरोना बाधित रूग्ण आढळून आले होते.माळशिरस तालुक्याची लोकसंख्या ४ लाख ८५ हजार एवढी असून येथे कोव्हीड केअर सेंटरसाठी ११३६ बेडची आवश्यकता असून तालुक्यामध्ये ३००  बेडचे 3 कोविड केअर सेंटर कार्यान्वित झाले आहे. संपूर्ण माळशिरस तालुक्यासाठी फक्त ३ डॉक्टर व १ स्टाफ नर्स यांची नियुक्ती केलेली आहे.जवळपास पाच लाखा लोकसंख्या असणा-या तालुक्यासाठी उपलब्ध असलेली यंत्रणा अपुरी आहे हे अन्यायकारक आहे असे प्रतिपादन भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.गेले तीन महिने माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभाग अपुऱ्या मनुष्यबळ व साधनासह  कोरोना परिस्थितीशी झुंज देत आहे. तालुक्यात मेडीकल व पॅरामेडीकल स्टाफ उपलब्ध नाही ना बेडची संख्या पुरेशी आहे. संसर्गाचा धोका लक्षात घेता कोरोना विरोधात लढण्यासाठी उपलब्ध असलेली  यंत्रणा अपूरी आहे हे सांगत मोहिते पाटील यांनी प्रशासनावर बोट ठेवले.
ग्रामीण भागात कोव्हीड १९ विरोधात लढण्यासाठी   यंत्रणाच उपलब्ध नाही तर कोरोना संसर्गाला अटकाव कसा घातला जाणार ? असा सवाल धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रशासनास उपस्थित केला. जर आरोग्य यंत्रणाच सक्षम नसेल तर ग्रामीण भागात कोरोनाचे संकट भयानक आणि गंभीर स्वरूप धारण करेल.तालुक्याची गरज पाहता  ११३६ बेडची आवश्यकता आहे तर १२ एम बी बी एस डॉक्टर, ६० आयुष डॉक्टर, २०० स्टाफ नर्स, १२ औषध निर्माण अधिकारी, १२ लॅब टेक्निशन ,६० वॉर्डबॉय, ६० स्वीपर ,१२ सिक्युरिटी व इतर सर्व आरोग्यविषयक साहित्य व मनुष्यबळ तीन  दिवसाच्या आत तात्काळ पुरवावे अशी मागणी केली मोहिते पाटील यांनी केली
माळशिरस तालुक्यासाठी आवश्यक मेडीकल व पॅरामेडीकल स्टाफ उपलब्ध करून यंत्रणा सक्षम न केल्यास आगामी काळातील निर्माण होणा-या गंभीर परिस्थिती व हानी साठी जिल्हा चिकित्सक, जिल्हा प्रशासन जबाबदार असेल असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला.

Reactions

Post a Comment

0 Comments