ग्रामीण भागात ट्रेसिंग, टेस्टिंग प्रभावीपणे करा
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या व्हीसीद्वारे सूचना
सोलापूर, दि.13 : ट्रेसिंग आणि टेस्टिंग प्रभावीपणे करा. कोरोना संशयित बाधितांचे तत्काळ स्वॅब घेऊन चाचणी करा. आयसोलेशन काटेकोरपणे करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.
श्री. शंभरकर यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी क्र.2 ज्योती पाटील, माळशिरस उपविभागीय अधिकारी शमा ढोक-पवार, अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड, मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे, माळशिरस तहसीलदार अभिजित पाटील, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, परराज्य आणि परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवा. त्यांची तपासणी करा, त्यांनी लक्षणे आढळल्यास मार्गदर्शक सूचनांनुसार होम क्वारंटाईन अथवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करा. वाधित व्यक्ती आढळलेल्या गावातील सर्व व्यक्तिंची तपासणी करा. गावातील सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करा.
तालुक्यातील कोविड केअर सेंटर, कोविड केअर हॉस्पिटल आणि डेटिकेटेड कोविड हॉस्पिटल यांची तपासणी करून तिथे आवश्यक साधनसामग्री असल्याची खात्री करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांवर पोलीस विभागाने लक्ष ठेवावे, त्यासाठी ग्राम रक्षक दलांची मदत घ्यावी, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
0 Comments