Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरची परीस्थिती आटोक्यात न येणे हे सरकारचे अपयश - धैर्यशील मोहिते पाटील

सोलापूरची परीस्थिती आटोक्यात न येणे हे सरकारचे अपयश - धैर्यशील मोहिते पाटील

प्रशासकीय यंत्रणेत समन्वय साधणा-या सक्षम  अधिका-याची गरज 


अकलूज (प्रतिनिधी) - सोलापूर मध्ये कोरोना बाधित संख्या वाढतच चालेली आहे. राज्यातील परीस्थिती देखील ढासळत आहे .सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. लोकांचा विश्वास सरकार  वर विश्वास राहीलेला नाही परीस्थिती आटोक्यात आण्यास सरकार अपयशी होताना दिसत आहे हे सरकार हतबल आहे असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगत सरकारच्या अकार्यक्षमतेवर टिका केला.

मोहिते पाटील पुढे म्हणाले  सोलापूर महापालिकेत  नवीन कमीशनर आणून बसवला तरी परीस्थितीस सुधारण्याचे  नाव नाही हे का होत असेल तर अपूरी सोई सुविधा , प्रशासकीय यंत्रणेतील समन्वयाचा अभाव, सरकारी  आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा. रूग्ण रोगाने मरण्यापेक्षा यंत्रणेच्या अकार्यक्षमतेने मरायला लागले आहेत.

जिल्हाधिका-यांचे  आदेश इतर प्रशासकीय अधिकारी खाजगी डाॅक्टर पाळत नाही त्यामुळे अनेक कोव्हीड पाॅझिटीव रुग्णांची त्याच बरोबर नाॅन कोव्हीड रूग्णांची हेळसांड होतीय. 

सोलापूरात निगेटिव्ह आलेला व्यक्ती इंदापूर मध्ये पाॅझिटीव येतो सोलापूरची आरोग्य व्यवस्था सदोष आहे सोलापूरची प्रतिमा सुधारण्याच्या नादात की आकडा कमी दाखवण्याचा प्रयत्न तर  केला जात नाही ना अशी शंका येण्यास वाव आहे. 

सोलापूरची परीस्थिती गंभीर बनत चाललेली आहे. सगळ्या सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. राज्याचे सोडा सोलापूरची परीस्थिती आटोक्यात आणायला जमत नसेल तर हे  सरकारचे व प्रशासनाचे  अपयशी धोरण आहे 

एकदंरीत सोलापूरला आता पर्यंत  तीन -तीन पालकमंत्री झालेत पण फुल टाईम एक पण नाही. प्रशासनाला  पुरेशा प्रमाणात कोरोना विरोधात लढण्यासाठी पुरेशा प्रमाणात संसाधने उपलब्ध होत नाहीत प्रशासन सरकारवर ढकलतय व राज्यकर्ते प्रशासनावर.

सोलापूर ची परीस्थिती भयानक आहे लोक जीव मुठीत घेऊन रोज॔दारीच्या शोधात घरा बाहेर पडत आहेत.  मी सोलापूर शहराच्या परीस्थिती वरून हे कोरोना विरुद्ध लढण्यास  सरकार अपयशी होत आहे सरकार हतबल आहे अशी सडकून टिका धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली.
Reactions

Post a Comment

0 Comments