शिवामृत दूध संघाच्या वतीने हेल्थ दूधाचे वाटप
अकलूज / प्रतिनिधी येथील शिवामृत दूध संघाच्या वतीने माळशिरस तालुक्याचा सर्व्हे करणारे जिल्हा परिषद शिक्षक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना संघाच्या वतीने हेल्थ दूधाचे वाटप करण्यात आले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, मार्गदर्शक संचालक राजसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या हेल्थ दूधाचे वाटप करण्यात आले.
सध्या सर्वत्र कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असताना स्वतःचा जिव धोक्यात घालून जिल्हा परिषद शिक्षक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर हे माळशिरस तालुक्याचा सर्व्हे करून कोविड -१९ बद्दल जनजागृती करीत आहेत. त्यांंच्या शरीरामध्ये ताकद येण्यासाठी शिवामृत दूध संघाने संग्रामनगर व अकलूज येथील २४८ सेवकांना हेल्थी दूधाचे वाटप केले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते, कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख, सेक्रेटरी प्रदिप पवार, बाळासाहेब बनकर, तानाजी पिसे आदि उपस्थित होते.
0 Comments