माजी आमदार युन्नुसभाई शेख यांचे निधन
सोलापूर (क.वृ. ):- सोलापूरचे माजी आमदार युन्नूसभाई शेख यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान निधन झाले .ते ऐंशी वर्षांचे होते. कालच त्यांना सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
1969 ; 1975 आणि 1985 साली तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. 1975 शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना युनूस भाई शेख यांना त्यांनी निवडून आणून महापौर केले .स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. 1990 झाली ते विधान परिषदेवर निवडून गेले मात्र 1998 साली सुभाष देशमुख यांच्याकडून ते पराभूत झाले.त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली असा परिवार आहे
0 Comments