अखेर राष्ट्रवादी कामगार सेलच्या आंदोलनाला यश -डॉ. गोवर्धन सुंचू
सोलापूर (क.वृ. ):- कोरोना या साथीच्या महामारीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून सोलापूर शहरातील विडी कारखाने बंद आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासून वेगवेगळे आंदोलन छेडले गेले होते, त्याचाच प्रत्यय म्हणून सोमपाचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी अखेर कामगारांच्या बाजूने निकाल दिल्याने विडी उद्योग पूर्ववत मंगळवारपासून सुरुवात करण्याचे जाहीर केले आहे.
हे सर्व आंदोलन घडत असताना सोलापूर शहरातील परिस्थितीची कल्पना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना वेळोवेळी दिली गेली. त्या अनुषंगाने शरद पवार यांनी विडी कामगारांच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व कामगार मंत्री यांच्याशी चर्चा करून विडी उद्योग सुरू करण्यास भाग पाडले. या आंदोलनात सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि सोलापूर जिल्हा सहायक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे यांचे सहकार्य लाभले. असे ही संचू यांनी सांगितले.
0 Comments