अळया मिश्रीत तांदळाचे वितरण जनसेवा संघटनेची कारवाईची मागणी
अकलुज(प्रतिनिधी)कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या तिन महिन्यापासून लॉक डाऊन व संचारबंदी राज्यात सुरु होती. या कालावधीत सर्व रोजगार धंदे बंद होते. त्यामुळे देशातील बेरोजगार झालेल्या नागरिकांची उपासमार होत आहे. यासाठी स्वस्त धान्य दुकानातील अन्नधान्याचा फार मोठा आधार मिळत होता. परंतु प्रेताच्या टाळु वरचे लोणी खाण्याचा गोरखधंदा काही स्वार्थी वृत्तीच्या व्यापाऱ्यांनी सोडला नाही. कोरोनाव्हायरसच्या संघर्षात गेल्या तिन महिन्यापासून रोजगार करणारे गरीब गरजू नागरिक रोजगारा अभावी घरीच बसून आहेत. हातावर कमावून,पानावर खाणारे अशा मजूर, अडलेल्या नडलेल्या गोरगरीब नागरिकांची तर आर्थिक कुचंबणा सुरू आहे .अशा अवस्थेत शासनाने सध्या नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय, बीपीएल, केशरी, अन्नपूर्णा व शुभ्र अशा वेगवेगळ्या शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण केले जाते. दिनांक १७ जूनला अकलुज येथील काही लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात धान्य उचलण्यासाठी गेले असता, त्यांना खूप जुने, अळ्या मिश्रित तांदूळ अन्नधान्य देण्यात येत होते. परंतु लाभार्थ्यांनी आम्ही या निकृष्ट दर्जाच्या खाण्यायोग्य नसलेल्या अन्नाधान्याची उचल करणार नाही असे सांगितले. परंतु या तांदळाशिवाय दुसरा तांदुळ मिळणार नाही हाच माल आला आहे. असे दुकानदाराने सांगीतले. कोरोना व्हायरसच्या काळात गोरगरिबांना या रेशन मुळे कुटुंबातील अन्नाची गरज थोड्याफार प्रमाणात भागत होती पण असले अळया मिश्रीत अन्न खाऊन आजारी पडायचे का उपाशी राहायचे या चक्रव्युहात सापडले आहेत.निकृष्ट दर्जाचे तांदुळ जे खाण्यास अयोग्य आहेत असे तांदूळ वाटप केले जात आहे. ही बाब जनसेवा संघटनेचे महिला आघाडीच्या जोतीताई कुंभार यांना समजली असता त्यांनी तहसीलदार यांना फोनवर हि माहीती सांगीतली तहसीलदार अभिजीत पाटील यांनी सदर लाभधारकांनी तांदूळ माघारी द्यावे सर्व कार्डधारकांना खाण्यायोग्य तांदुळ बदलून दिले जाईल व येथून पुढे असा निक्रुष्ट दर्जाच्या तांदळाचे वाटप होणार नाही अशी दक्षता घेतली जाईल असे सांगितले.
शासन जो तांदूळ खरेदी करतो.त्या तांदळाची गुणवत्ता सुध्दा असायला हवे असे नियम आहे. सदर निकृष्ट धान्य पुरवठा करून स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाच्या पुरवठा करण्यात आलेल्या तांदळाची गोरगरिबांचे जीवाशी खेळणारे लोकांची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी जोती ताई कुंभार यांनी केली आहे.
0 Comments