वाणीचिंचाळे येथे सेनेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
घेरडी (क.वृ.)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्ववजी ठाकरे यांच्या आवाहनानुसार शिवसेनेच्या 54वा वर्धापनदिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी हनुमान मंदिरात सोशल डिस्टंन्सचा अवलंब करून 54 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन शिवसेना तालुका प्रमुख सुर्यकांत घाडगे, शहरप्रमुख कमरूद्दीन खतीब, बाबुराव सोपे, रघुनाथ गायकवाड, रोहित पवार, अशोक गंगाधरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावातून जास्तीत जास्त रक्तदान करून या मोहीमेला सहकार्य करण्याचे प्रयत्न केले जात आहेत हे सांगितले. तसेच यापुढेही अशाच प्रकारे सामाजिक कामे हाती घेऊन ती पुर्ण करावीत.
यावेळी गावातील रक्तदात्यांना प्रोत्साहन म्हणून भेटवस्तु देण्यात आली.यावेळी अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments