Hot Posts

6/recent/ticker-posts

पावसाळ्यात पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी वृक्षारोपण करावे - युवानेते दिपक देशमुख

पावसाळ्यात पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी वृक्षारोपण करावे - युवानेते दिपक देशमुख

मानेगाव स्वच्छ व सुंदर आणि निसर्गरम्य होणे आवश्यक
माढा (क.वृ.):- सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे त्यामुळे माढा तालुक्यातील गावोगावच्या ग्रामस्थ व युवकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या शेतात,बांधावर, पडित क्षेत्रात,घराच्या आजूबाजूला रिकाम्या जागेत, शाळेच्या परिसरात तसेच गावातील रस्त्यांच्या दुतर्फा, ग्रामपंचायतीच्या जागेत अशा अनेक ठिकाणी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण केल्यास गावचा परिसर सुंदर आणि निसर्गरम्य होईल आणि भरपूर ऑक्सिजनची निर्मिती होऊन प्रदूषण रोखण्यात येईल असे प्रतिपादन माढा तालुक्यातील मानेगावचे युवानेते दिपक देशमुख यांनी केले आहे.
     ते मानेगाव येथे दिपक देशमुख मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित  वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
      मानेगावातील स्मशानभूमी परिसरात गुलमोहर,करंजी,चिंच व इतर जातीची झाडे लावून परिसर सुंदर व निसर्गरम्य करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून या वृक्षांची संगोपनाची जबाबदारी संपूर्णपणे आम्ही घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.या विधायक उपक्रमातून गावातील इतर लोकांनीही प्रेरणा घेऊन गावांच्या रिकाम्या परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे तसेच गावातील मुख्य चौक व परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा असे आवाहन युवानेते दिपक देशमुख यांनी केले.
       याप्रसंगी प्रशांत देशमुख,रणजित देशमुख,आनंद देशमुख,प्रवीण देशमुख,संतोष देशमुख,सादिक शेख यांच्यासह इतर युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments