अनोखी साडी सेंटर मंगळवार गुरुवार व शनिवार ग्राहकांच्या सेवेत..
सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापुरातील बाळीवेस चौकातील सुप्रसिद्ध नामवंत साडी शोरूम म्हणजेच अनोखी साडी सेंटर गेल्या दोन ते अडीच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुनश्च एकदा ग्राहकांच्या सेवेत यशस्वीपणे सुरू झालेला आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड सध्या धास्ती आहे.. परंतु योग्य काळजी आणि खबरदारी घेऊन ग्राहकांनी खरेदीसाठी यावे आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन अनोखीचे संचालक सतीश राजानी यांनी ग्राहकांना केलेला आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की ग्राहकांसाठी आणि स्टाफ मधील प्रत्येक व्यक्तीसाठी परिपूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे. मास्क घातल्याशिवाय ग्राहकांना शोरूममध्ये खरेदीसाठी प्रवेश दिला जात नाहीं आणि स्टाफ मधील प्रत्येक व्यक्तीला वारंवार हात पाय स्वच्छ धुणे..सैनीटायझरने हात स्वच्छ करणे आणि काम करत असताना आणि ग्राहकांशी संभाषण करत असताना मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेले सर्व नियमांचे पालन करून अत्यंत सुरक्षित रित्या व्यवहार केले जात असल्याचे ते म्हणाले.शोरुमच्या बाहेरील बाजूस ग्राहकांसाठी सैनी टायझर टनेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ग्राहकांच्या सुरक्षितेसाठी अनोखी साडी कटिबद्ध असून ग्राहकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण काळजी घेऊन खरेदीसाठी यावे आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्यावा असे त्यांनी कटूसत्य शी बोलताना सांगितले. प्रत्येक मंगळवारी गुरुवारी व शनिवारी अनोखी साडी ग्राहकांच्या सेवेत कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. अधिक माहितीसाठी 9422380373 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी ग्राहकांना केलेला आहे.
0 Comments