अन्नपूर्णा मिठाई नमकीनच्या सातव्या आउटलेटचा शानदार शुभारंभ..
सोलापूर(क.वृ.): अन्नपूर्णा मिठाई नमकीन च्या सातव्या शाखेचा शुभारंभ विजापूर रोडवरील आयटीआय चौकात झाला असल्याची माहिती संचालक नंदकिशोर तिवाडी यांनी कटुसत्य शी बोलताना सांगितले. गेली चाळीस वर्षे सोलापूरकरांच्या अविरत सेवेत असलेल्या अन्नपूर्णा मिठाई नमकीन मध्ये बेकरी उत्पादनांबरोबरच गरम समोसे, मिठाई, कचोरी, खमंग ढोकळा असे रुचकर फास्ट फूड मिळतात.. त्याच बरोबर या टाळेबंदी च्या कालावधीमध्ये अन्नपूर्णा मिठाई नमकीनने ग्राहकांसाठी एक नवी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांच्या सुरक्षितेसाठी सैनी टायझर, मास्क, आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेले सर्व नियमांचे पालन करून पुनश्च एकदा सोलापूरकरांच्या सेवेत रुजू झाल्याचे तिवाडी यांनी सांगितले. वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवत असताना योग्य ती खबरदारी घेण्याबरोबरच ग्राहकांना ते पदार्थ देताना ग्लोज वापरण्यात येत असल्याचं ते म्हणाले. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व ती खबरदारी घेऊन ग्राहकांनी अन्नपूर्णा मिठाई नमकीन च्या नानाविध चविष्ट आणि रुचकर पदार्थांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन तिवाडी यांनी केलेला आहे.
0 Comments