रुग्णालयांमधुन होणारी लुटमार थांबवा अन्यथा गाठ युवासेनेशी - मनिष काळजे
सोलापूर(क.वृ.): गेल्या महिनाभरापासुन कोरोना रुग्णांची खाजगी दवाखान्यामधुन होणारी लुटमार हि चिंतेची बाब बनली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. टाळेबंदीच्या कालावधीमध्ये शहराचे अर्थचक्र आधीच डबघाईला आलेला असताना नागरिकांची खासगी रुग्णालयांकडून होणारी ही लूटमार थांबायला हवी अन्यथा युवासेना स्वस्थ बसणार नाही अशी तंबी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी कटुसत्यशी बोलताना सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की सोलापुर हे कष्टकरी व गोरगरिबांचे शहर आहे आणि आधीच कामधंदे बंद असताना आर्थिक चणचण नागरीकांना जाणवत असताना कोरोनाबाधित रुग्णांकडून लाखो रुपयांचे बिल आकारून त्यांची हेळसांड केली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. खासगी रुग्णालयांकडून नागरिकांची होणारी फसवणूक आणि लूटमार यासंदर्भात कोणत्याही नागरिकांची तक्रार असेल तर त्यांनी 70 66 82 30 31 या संपर्क क्रमांकावर ती फोन करून कळवावे असे आवाहन युवा सेना जिल्हाप्रमुख अजय काळजे यांनी नागरिकांना केलेला आहे.
0 Comments