झाडांना जीवदान देणे सर्वांचेच कर्तव्य.. डॉ.चंद्रशेखर हळींगळे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 29, 2020

झाडांना जीवदान देणे सर्वांचेच कर्तव्य.. डॉ.चंद्रशेखर हळींगळे

झाडांना जीवदान देणे सर्वांचेच कर्तव्य.. डॉ.चंद्रशेखर हळींगळे




कोल्हापूर(क.वृ.): वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वृक्षामुळे आपल्याला शुद्ध हवा, ऑक्सीजन आणि इतर अनेक गोष्टी प्राप्त होतात. कोल्हापूर जिल्ह्यातील मिरज येथील निर्मल फाऊंडेशनचे डॉ. चंद्रशेखर हळींगळे यांनी स्वतःच्या फार्म हाऊस जवळ असलेली पंधरा ते वीस वर्षे जी जुनी झाडे नॅशनल हायवे तयार करण्यासाठी कापली जाणार होती त्या झाडांची तोड होऊ न देता ती सर्व झाडे क्रेन आणि ट्रॉली च्या मदतीने अलगदपणे इतर ठिकाणी पुनर्रोपण(replantation) करून एक नवा आदर्श निर्माण केलेला आहे.
यासाठी झाडाच्या बुंध्याजवळ जवळजवळ 8 ×8 ft चा खड्डा खणून झाडे बाहेर काढण्यात आली आणि नवीन ठिकाणी लावण्या अगोदर झाडाची मुळे आणि माती जमिनीला  घासू नये म्हणून  पोते आणि साधे  कापडाने बांधून घेतले.नवीन ठिकाणी जवळपास  दहा बाय दहाचा खड्डा करून झाडे लावण्यात आली•
वृक्ष वाचविण्याच्या या चांगल्या कामांमध्ये डॉ.चंद्रशेखर हळींगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मल हॉस्पिटलची पूर्ण टीम आणि झाडे लावण्यात प्रवीण असलेले स्वरूप रायनाडे, विनायक कवडे, सागर जाधव, भैरव वालीकर, दीपक साळुंखे, गजानन दहोत्रे, सिकंदर शेख, रावसाहेब मुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच श्री कोलेकर यांची अर्थमूव्हर्स जेसीबी, दत्त क्रेन आणि ट्रॉली यांचे सहकार्य मिळाले. काही कारणास्तव जर झाडे कापण्याची वेळ आलीच तर ती न कापता त्यांनी
8698732109/
9860540896/7522920051 या मोबाईल नंबर वर संपर्क करून आम्हाला झाडे सुपूर्द करावीत आम्ही ती इतर ठिकाणी  पुनर्रोपण करून झाडांना जीवदान देऊन निसर्ग सुंदर बनवू असे भावनिक आवाहन  निर्मल फाऊंडेशनचे डॉ. चंद्रशेखर इंगळे यांनी सांगलीकरांना केलेला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages