डॉक्टर्सडे निमित्त लोकमंगल पतसंस्थेच उपक्रम करमाळ्यातील 100 डॉक्टरांना देणार पीपीई किट
सोलापूर(क.वृ.): कोरोनाच्या महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व डॉक्टर काम करत आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम म्हणून 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे निमित्त लोकमंगल नागरी पतंसस्था, करमाळा शाखेच्यावतीने तालुक्यातील डॉक्टरांना आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते पीपीई किट देण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या काळात आ. सुभाष देशमुख यांनी संवाद सेतू उपक्रमांतर्गत कॉल कॉन्फरन्स द्वारे जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांशी संवाद साधला होता. त्यावेळी करमाळ्यातील डॉ. रवीकिरण पवार यांनी तालुक्यातील सर्व डॉक्टर चांगले काम करत आहेत, फक्त त्यांना पीपीई कीटची कमतरता आहे, ती पूर्ण करावी, अशी मागणी केली होती. ती मागणी लागलीच आ. देशमुख यांनी मान्य केली असून लोकमंगल पतसंस्थेच्या करमाळा शाखेच्यावतीने डॉक्टर्स डे चे औचित्य साधून 1 जुलै रोजी तालुक्यातील 100 डॉक्टरांना पीपीई किट वाटप करण्यात येणार आहे.
ही मदत नसून कर्तव्यः आ. देशमुख. कोरोनाच्या महामारीत सर्व डॉक्टर देवासारखे कार्य करत आहेत. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. डॉक्टर्स डे निमित्त त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आपले कर्तव्य म्हणून लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने तालुक्यातील डॉक्टरांना कीटचे वाटप करण्यात येणार असल्याचे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.
0 Comments