Ads

Ads Area

स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव घरातच साजरा करूया...

स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव घरातच साजरा करूया... 
शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे आव्हान.... 

  
            सोलापूर :- कोरोनाव्हायरस ने जगभर थैमान घातले आहे या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे.कोरोना विषाणूला जर या लढाईत हरवायचे असेल तर सर्व शिव शंभू मावळ्यांनी घरात राहूनच स्वराज्य रक्षणाची जबाबदारी पार पाडून या संकटावर मात करायची आहे असे आवाहन शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष नितीन भैया चव्हाण यांनी केले आहे.
  छत्रपती शंभूराजे यांच्या 363 व्या जयंतीनिमित्त दिनांक 12 मे ते 14 मे या कालावधीत सोलापूर सह संपूर्ण देशात छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.परंतु कोरोना विषाणू महामारीमुळे संपूर्ण जग आणि भारत देश संकटात आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये  सण उत्सव व यात्रा अदिवर बंदी आली आहे.त्यामुळे शिवशंभु प्रेमीनी जयंती उत्सव साधेपणाने म्हणजेच दिनांक 14 मे 2020 गुरुवार रोजी घरातच छत्रपती शंभूराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करावे असे आवाहन शंभुराजे युवा संघटन महाराष्ट्र प्रणित शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष नितीन भैया चव्हाण, सरचिटणीस राहुल पवार,शहराध्यक्ष उस्मान आत्तार,प्रसिद्धीप्रमुख अनिल कवडे,महिला आघाडी शहराध्यक्ष निकिता दनके,सोशल मीडिया प्रमुख नितेश माने आदींनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close