रुई येथील रक्तदान शिबिरात ५० जणांनी केले रक्तदान
महिलांनी रक्तदान करून रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असा दिला संदेश
टेंभूर्णी (प्रतिनिधी) :- माढ तालुक्यातील रुई येेेेथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५० रक्त बाटल्यांचे संकलन करून कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ मानून ५० जणांनी रक्तदान केले.
कोरोणाचा वाटता पादुर्भाव त्यामुळे रक्ताचा जाणवत असलेला तुटवडा पाहून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत रूई येथे ५० जणांनी रक्तदान केले. कोरोनाच्या लढ्यात ग्रामीण भागातील ४ महिलांनी रक्तदान करून देश सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकले तर यावेळी ४६ पुरुषांनी रक्तदान केले. सुरक्षित अंतर ठेवून स.म.शंकरराव मोहिते-पाटिल ब्लड बँक अकलूज व ग्रामपंचायत रुई यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिरासाठी डाॅ.आजित गांधी, ङाॅ.संतोष दोशी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील ङाॅ. खटके व त्याचे सहकारी श्री नाळे, आरोग्य सेविका डोंगरे मॅङम, तलाठी खुळे भाऊसाहेब, रूई गावचे ग्रामसेवक समीर शेख, सरपंच बाळासाहेब झेंडे, निजाम काझी, आशासेविका, अंगणवाडी सेविका, गावातील तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments