नाभिक समाजाला आर्थिक मदत करा- डाॅ.धवलसिंह
अकलूज (प्रतिनिधी) कोरोना सारख्या घातक विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण भारतात टाळेबंदी आहे. या महारोगामुळे जमावबंदी कायदा लागू असलेने गेल्या दोन महिन्यापासून सर्व नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. यामुळे नाभिक समाजातील पारंपरिक व्यवसाय संपूर्णपणे बंद पडला आहे महाराष्ट्रातील केशकर्तनाची दुकाने बंद असलेले जवळपास दोन महिन्यापासून या समाजातील कुटुंबांचे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होऊन अनेक कुटुंबाची उपासमार होत आहे आहे.
नाभिक समाजातील ९५ टक्के लोक हा पारंपारिक व्यवसाय करित असुन या व्यवसायावरच या समाजातील लोकांना जीवनमान अवलंबून आहे. लाॅकडाऊन मुळे या कारागीरांवर मोठे आर्थिक संकट आलेले आहे तसेच या समाजातील अनेक तरुणांनी कर्ज काढून केस कर्तनालय सलुन दुकाने चालू केलेले आहेत परंतु लाॅकडाऊन मुळे हे युवक कर्जबाजारी झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये या व्यवसायावर अवलंबून असलेल्या चालक,मालक व कामगारांची मिळुनश संख्या सुमारे ३० लाखापेक्षा जास्त आहे. लाॅकडाऊन मुळे नाभिक समाजाचा हा पारंपारिक व्यवसाय पूर्णपणे बंद असलेने जागेचे भाडे,बॅंकेचे हप्ता,घरभाडे,घरचा किराणा ,लाईट बिल कसे भरायचे अशा विवंचनेत हा समाज पडला आहे.
तरी नाभिक समाजाला सरकारने प्रति कुटुंबाला प्रति महीना १० हजार रूपये इतके अनुदान द्यावे तसेच दुकानाचे वीज बिल माफ करावे अशी मागणीचे निवेदन डाॅ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे इमेल द्वारे केले आहे.
0 Comments