Ads

Ads Area

तमिळनाडूसाठी रेल्वे सोडण्याचे प्रशासनाकडून नियोजन सुरू जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

तमिळनाडूसाठी रेल्वे सोडण्याचे
प्रशासनाकडून नियोजन सुरू
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती



सोलापूर दि. 6: लॉकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या तमिळनाडूतील मजुरांना गावी पाठविण्यासाठी पंढरपूर येथून रेल्वे सोडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची  माहिती  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्थलांतरीत मजूर अडकलेले आहेत. त्यांना त्यांच्या
गावी परत पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनकडून नियोजन करण्यात येत आहे. याबाबत श्री. शंभरकर यांनी सांगितले की, सोलापूरातून इतर राज्यात जाण्यासाठी 12846 जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये निवारा शिबीरातील 3290 स्थलांतरीत मजूरांचा समावेश आहे. सोलापूरातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 5528 अर्ज प्राप्त झाले आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया सुरु आहे.
इतर जिल्ह्यातून सोलापूरात येण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या 107 जणांना ना-हरकत प्रमाणपत्र संबंधित जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या 157 अर्जांना ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे अर्ज पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
ऑनलाईन अर्ज करतांना नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचे प्रमाणपत्र, छायाचित्र, ओळखपत्र अपलोड करावे. नागरिकांना ज्या जिल्ह्यात जायचे आहे त्या जिल्हा प्रशासनाकडून ना-हरकत प्रमाणपत्र आल्याशिवाय परवानगी दिली जाणार नाही. तरी नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करतांना दक्षता घ्यावी , असे आवाहन शंभरकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close