अकलूज पोलिसांनी केल्या वेगवेगळ्या तीन कारवाया
अकलूज(विलास गायकवाड) - अकलूज पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळीनगर बिट मध्ये काम करणारे ए.एस.आय भातुंगडे, ए .एस.आय. निकम, पोलीस कॉन्स्टेबल घाडगे, पवार, शिंदे ,असे अकलूज हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वेळापूर पोलीस ठाणे अंमलदार यांनी फोनद्वारे ईनेव्हा कार नंबर एम एच १२ एफझेड ७३५६ तोंडले-बोंडले येथील पॉईंट वरील बैरिकेटिंगला घासून श्रीपुरकडे निघून गेले आहे. असे कळल्याने लागलीच वरील कर्मचारी यांनी श्रीपूर माळीनगर हद्दीत सदर कारचा शिताफीने शोध घेऊन सदर कारचा पाठलाग करून, पांढरे वस्ती येथील नवले वस्ती जिल्हा परिषद शाळेजवळील २१चारी कॅनाल पट्टीवर पकडून सदर कारची तपासणी केली असता. त्यामध्ये दोन पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक गोणी मध्ये नजर गुटका ४३ हजार २०० रूपयाचा मिळून आल्याने गाडी चालक पांडुरंग उर्फ प्रवीण उर्फ पंप्या सदाशिव भोसले राहणार आसबे प्लॉट संग्रामनगर तालुका माळशिरस याने पुरवठादार दिलीप म्हस्के राहणार एकतपुर रोड सांगोला, जिल्हा सोलापूर यांचे कडून सदरचा माल त्याचा साथीदार संदीप उर्फ सम्प्या सुभाष पिसे राहणार वेळापूर, तालुका माळशिरस यांचेसह घेऊन आल्याने सर्व आरोपी विरुद्ध भारत भीमराव भोसले अन्न सुरक्षा आयुक्त सोलापूर यांनी फिर्याद दिली असून पांडुरंग उर्फ प्रविण उर्फ पम्प्या सदाशिव भोसले रा.आसबे प्लॉट संग्राम नगर तालुका माळशिरस यास अटक करण्यात आले असून, दिनांक १८/०४/२०२० रोजी पर्यंत रिमांड मंजूर असून उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.आरोपी भोसले
हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हद्दपारीची सुनावणी सुरू असताना सदरचा गुन्हा केले असल्याची माहिती अकलूज पोलिसांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात आलेल्या ६ इसमावरती अकलूज पोलिसांची कारवाई..
जिल्हा बंदीचा आदेश असताना सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यातील ६ इसम सोलापूर जिल्ह्यात आले असल्याचे मिळून आले. म्हणून जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयीची कृती केल्याने गावकामगार तलाठी अकलूज अनिल शंकरराव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनुक्रमे १ ते ६ यांचे विरुद्ध भादवि सं.क. २६९,१८८ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींना कोरनटाईम करून ठेवण्यात आलेले आहे. तर सुनिल पवार ,गणेश सुनिल पवार ,महादेव पवार, सोनाली सुनिल पवार, तुकाराम पवार लक्ष्मी पवार, सोमनाथ लंबाते राहणार सर्व मदनसिंह नगर चौंडेश्वरीवाडी तालुका माळशिरस यांनी भगवान तांबिले यांचे घरासमोर येऊन लहान मुलांचे भांडणाचे कारणावरून शिवीगाळ दमदाटी करून धारदार शस्त्राने मारहाण करून भगवान तांबिले त्यांची पत्नी द्रौपदी मुलगा तानाजी मुलगी अनिता यांना जखमी केले. सदर आरोपीविरुद्ध ३०७ प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यमगरसाहेब करीत आहेत.
0 Comments