परिते येथे जनसेवा संघटनेच्या वतीने ९० मजुरांना फळे व नाष्टा वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 14, 2020

परिते येथे जनसेवा संघटनेच्या वतीने ९० मजुरांना फळे व नाष्टा वाटप

परिते येथे जनसेवा संघटनेच्या वतीने ९० मजुरांना फळे व नाष्टा वाटप

 अकलूज( प्रतिनिधी ) - जनसेवा संघटना महाराष्ट्र राज्य , ग्रामपंचायत परिते ता .माढा व डॉ.धवलसिंह प्रतापसिंह  मोहिते-पाटील  यांचे मार्गदर्शनाखाली  आज  देशात असलेल्या संचार बंदीमुळे मुंबई,पुणे व इतर मोठ्या शहरातील मजूर लोकांचे फार हाल चालू असून त्यांना धड स्वतःच्या गावाकडे हि जात येत नाही व दोन वेळचे अन्न हि मिळेनासे झाले आहे. याचा विचार करून पुण्यावरूनआपल्या गावी  पायी चालत  जाणारे  सुमारे ९०  मजुर हे टेम्भुर्णी येथील संत रोहिदास आश्रमशाळा येथे  तात्पुरत्या निवासी स्वरूपात राहत आहेत. हे  सरपंच पिंटू (भैया)पाटील यांना कळल्यावर त्यांनी व जनसेवा माढा तालुका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या मजुरांना आज सकाळी नाष्टा व फळे याचे वाटप केले.
यावेळी टेम्भुर्णीच्या मंडल अधिकारी लकडे मॅडम, तसेच जनसेवा माढाचे मल्हार मुसळे,किरण साळुंखे,किशोर चव्हाण,शंकर झांबरे,अशोक मुसळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी कर्नाटकातील मजुरांनी सरपंच व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages