कै .वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात शुक्रवारी शालेय पोषण आहार साहित्य वाटप .
सांगोला :- सांगोला शहरातील कै .वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयातील विद्यार्त्याना शालेय पोषण आहार अतंर्गत साहित्याचे वाटप शुक्रवारी दि १० व शनिवारी ११ एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे मॅडम यांनी दिली .
या शालेय पोषण आहारामध्ये तांदूळ ,उपलब्ध असणारे डाळी ,कडधान्ये आदी साहित्य वितरित करण्यात येणार आहे .पोषण आहाराचे वाटप सोशल डिस्टंसिन्ग राखत करण्यात येणार आहे प्रशालेत इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंत शिक्षण घेणार्या सर्व विध्यार्त्यांच्या पालकांनी शुक्रवार व शनिवारी या दोन टप्प्यात सकाळी १०.३० वाजता ,ओळखपत्र (आधारकार्ड )पिशवी(ब्याग ) घेऊन उपस्थित रहावे ,तरी पालक किंवा विध्यार्त्यानी दिलेल्या कालावधीत साहित्य घेऊन जावे .या शालेय पोषण आहार साहित्य वाटपाच्या माहितीकरिता पालकांनी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे मो .९७६३५००७४१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आहवाहन सांगोल्यातील कै .वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयाने केले आहे .
0 Comments