*हनुमान जयंतीनिमित्त ३५ दात्यांचे रक्तदान*
*सोलापुर—* हनुमान जयंतीनिमित्त रेवणसिद्धेश्वर नगर येथील हनुमान मंदिरात रक्तदान शिबीराचे आयोजन शिबीर झाल्याची माहिती क्रांतीसुर्य सामाजिक संस्थेचे संस्थापक महेश आठवले यांनी दिली.
कोरोना या महामारीने सध्या भारतात थैमान घातले आहे.या पार्श्वभुमीवर हनुमान जयंतीचे औचित्य साधुन कांतिसुर्य सामाजिक संस्थेच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुरक्षित अंतर व स्वच्छता बाळगण्यात आली.३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी मल्लिकार्जुन ब्लड बॅंकेचे सहकार्य लाभले.या वेळी महेश आठवले,शशिकांत भडकुंबे,राजु गायकवाड,सादु बनसोडे,प्रशांत जाधव,कमलाकर कांबळे,अमोल जगताप,सागर गायकवाड आदी उपस्थित होते.
0 Comments