Hot Posts

6/recent/ticker-posts

पत्रकार हा समाजाचा मार्गदर्शक -- नागेश फाटे पत्रकार सेवा संघाच्या वतीने पत्रकारांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप



पत्रकार हा समाजाचा मार्गदर्शक -- नागेश फाटे
पत्रकार सेवा संघाच्या वतीने पत्रकारांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप


पंढरपूर : पत्रकार हा समाजाचा मार्गदर्शक आहे,समाजातील वाईट आणि चांगल्या घटनांची नोंद तो आपल्या लेखणीद्वारे करीत असतो,त्यामुळे त्यांचे समाजाप्रती असणारे श्रेय श्रेष्ठ असल्याचे मत उद्योजक नागेश फाटे यांनी व्यक्त केले.पत्रकार सेवा संघ प महारास्ट्राचे विभागप्रमुख संभाजी साठे यांच्या संकल्पनेतून आणि NP Construction(नागेश फाटे) यांच्या सहकार्याने तालुक्यातील पत्रकाराना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. या वेळी  प्रांताधिकारी सचिन ढोले,पत्रकार सेवा संघाचे प महाराष्ट्र विभागप्रमुख संभाजी साठे,पत्रकार सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष भागवत लोखंडे,जिल्हा मार्गदर्शक नवनाथ गायकवाड,रामेश्वर कोरे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जोतीराम वाघमारे,नवनाथ खिलारे आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     या वेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पत्रकारांप्रति हा आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम पत्रकारांचा मानसन्मान वाढविणार असल्याचे मत व्यक्त करून संभाजी साठे आणि नागेश फाटे यांचे कौतुक केले.
Reactions

Post a Comment

0 Comments