
बार्शीतील प्रसिध्द व्यवसायीक प्रशांत पैकेकर यांनी त्यांचे पुत्र पुष्कर पैकेकर यांच्या वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देवुन वृक्ष संवर्धन समिती च्या कार्याला बळकटी येण्यासाठी एक लाखा रुपयाची मदत केली या आगोदर पन पैकेकर साहेबांनी समितीला विविध प्रकारे सहकार्य केले आहे.गेल्या वर्ष भरापासुन वृक्ष संवर्धन समितीच्या मार्फत शहराच्या विविध भागात वृक्ष लागवड करण्यात आली आसुन ती लावलेली झाडे ही उत्तम रित्या जोपासण्याच काम सर्व सदस्यांकडुन केले जात आहे.आत्ता पर्यंत शहरात जवळ जवळ दोन हजार आठशे झाडे लावण्यात आली आहेत.यावेळी प्रशांत पैकेकर म्हणाले की पर्यावरणाचा समतोल राखने हे फार महत्वाच आणि जरुरीच काम आहे आणि ते आवगडही आहे पण सर्व सदस्य हे काम मोठ्या मेहनतीने करत आहेत त्यामुळे मी माझ्या मुलाच्या वाढदिवसाच अौचित्य साधुन माझी एक नागरीक म्हणुन जबाबदारी समजुन ही मदत करत आहे. सुरुवातीला पुष्कर याच्या हस्ते वृक्षा रोपण ही करण्यात आले.यावेळी सौ. अश्विनी पैकेकर,उद्याजक अभय खांडवीकर तसेच वृक्ष संवर्धन समितीचे उमेश काळे,अतुल पाडे,रुषिकांत पाटिल,संपत देशमुख, सुधिर वाघमारे,सचिन शिंदे, प्रफुल्ल गोडगे, राहुल काळे,बाबासाहेब बारकुल हे उपस्तिथ होते.समितीच्या वतीने अतुल पाडे यांनी आभार मानले.
0 Comments