Hot Posts

6/recent/ticker-posts

घरातूनच दिले शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे

           घरातूनच दिले शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे

         तंत्रस्नेही शिक्षक राजकिरण चव्हाण यांचा ‘ट्रेनिंग फ्रॉम होम’ हा अनोखा उपक्रम!

गेल्या चोवीस तारखेपासून सबंध भारतामध्येच लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सरकारकडून प्रत्येकाला आपापल्या घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या काळात सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सर्व विद्यार्थी, शिक्षकांना घरीच राहण्याचे व या दरम्यानच्या काळात 'वर्क फ्रॉम होम' करण्याचा आदेश शासनाने शिक्षकांना दिला. या अनुषंगाने शिक्षकांनीही आपल्या मोबाईलवरून, व्हाट्सअॅपवरून विद्यार्थ्यांना रोजचा घरचा अभ्यास व इतर उपक्रम हाती घ्यायला सुरुवात केली. राजकिरण चव्हाण या तंत्रस्नेही शिक्षकाने मात्र आपले शिक्षक बांधव तंत्रस्नेही व्हावेत यासाठी *'ट्रेनिंग फ्रॉम होम'* हा अभिनव ऑनलाईन उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाअंतर्गत एकूण पंधरा कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. आजपर्यंत कार्यशाळांचा 4500 हून अधिक शिक्षकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. शिक्षकांना तंत्रज्ञानाची गोडी लागावी, शिक्षक तंत्रस्नेही होऊन विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवावे, काळानुसार आपल्या अध्यापनामध्ये अपेक्षित बदल करावा. जेणेकरून विद्यार्थीही भविष्यातील बदलांना उत्तमपणे जुळवून घेऊ शकतील या उद्देशाने ह्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.
तंत्रस्नेही शिक्षक राजकिरण चव्हाण हे श्री समर्थ विद्या मंदिर, शास्त्री नगर सोलापूर येथे कार्यरत आहेत. या आधीही शिक्षकांच्या मनातील तंत्रज्ञानाची भीती निघून जावी यासाठी 'फरगेट द टेक्नोफोबिया', 'FAQ (फ्रिक्वेन्टली आस्क्ड क्वेश्चन) कॅम्पेन', 'शिक्षणात तंत्रज्ञान' अशा विविध उपक्रमांतून हजारो शिक्षकांना ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन तंत्रस्नेही केले आहे.
                      राजकिरण चव्हाण यांनी या ऑनलाईन प्रशिक्षणसाठी उपयुक्त असे घटक निवडून त्याचे प्रशिक्षण दिले आहे. ॲनिमेटेड पीपीटी, व्हाईस टायपिंग, शैक्षणिक ब्लॉग निर्मिती, फेसबुक लाईव्ह, गुगल ड्राईव्ह, स्मार्ट पीडीएफ, गुगल कीप अॅप, जीआयएफ, क्यूआर कोड निर्मिती, हायपरलिंक, मोबाईलच्या माध्यमातून शैक्षणिक व्हिडीओची निर्मिती, गुगल फॉर्म, ई-परीक्षा, स्क्रीन कास्ट, एक्सेल आदी विषयांवर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना फेसबुक आणि यूट्यूबवर प्रशिक्षण अगदी निशुल्क देण्यात आले आहे. आतापर्यंत हजारो शिक्षकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतलेला आहे. ज्यांना ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी होता आले नाही, ते या कार्यशाळा 'सृजनशील शिक्षक' या राजकिरण चव्हाण यांच्या यूट्यूब चॅनलवरसुद्धा पुन्हा पाहू शकतील. सर फाऊंडेशन महाराष्ट्राच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात राज्यातील विविध ठिकाणच्या अनेक शिक्षकांना घरबसल्या शैक्षणिक तंत्रज्ञानाविषयी उपयुक्त माहिती मिळत असल्याचा फायदा होत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments