हायड्रॉक्सीक्लाेराेक्विन आैषधाचा राज्यातील मेडिकलमध्ये तुटवडा
सातारा : सातारा, पुणे, सह महाराष्ट्रातील अनेक मेडिकलमध्ये हायड्रॉक्सीक्लाेराेक्विन आैषध गाेळी मिळत नसल्याची माहिती समाेर आली असून माेठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने गेल्या आठ दिवसांपासून या गाेळीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
हायड्रॉक्सीक्लाेराेक्विन ही गाेळी अँटीव्हायरस तथा व्हायरल राेखण्याते काम करते. सध्या काेराेना व्हायरलने भारतासह जगाला अडचणी आणले असून हायड्रॉक्सीक्लाेराेक्विन ही आैषध गाेळी अनेक आजार राेखण्याचे काम करते तसेच कामानिमित्त बाहेर पडणा-यांचे काेराेना व्हायरस पासून राेखण्याचे काम करते, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
हायड्रॉक्सीक्लाेराेक्विन या आैषधाची भारत देशाला सुमारे २ काेटी ४० लाख गाेळ्यांची वर्षाला मागणी आहे. वर्षाला देशाची २० काेटी गाेळ्या तयार करण्याची क्षमता असताना आठ दियसांपासू सहज मिळणारी गाेळी तथा आैषध एम. डी. डॉक्टरांच्या चिठ्ठीनेही मिळत नाही.
ब-यात देशांनी भारताकडे या आैषधांची मागणी केल्याने निर्यात बंदी काही प्रमाणात उठवली असल्याने अमेरिकेलाही भारताने हा आैषध पुरवठा केला आहे. भारत जगाच्या तुलनेत जवळ जवळ ७० % हायड्रॉक्सीक्लाेराेक्विन आैषध तयार करताे. निर्यातामध्येही भारताचा सर्वात माेठा वाटा आहे.
या आैषधाप्रमाणेच पेरासिटीमॉल या आैषध गाेळीसह डायबिटीज़, शुगर साठी लागणा-या आैषधांची मागणी वाढल्याचे मेडिकल चालक सांगत आहेत.
0 Comments