कॉन्फरन्सद्वारे पार पडली लोकमंगल बँकेची सभा
सोलापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकमंगल को - ऑप. बँकेची संचालक मंडळ सभा गुरूवारी कॉन्फरन्सद्वारे पार पडली. अशा पद्धतीची राज्यातील पहिलीच सभा आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख हे होते.
प्रथम बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले. त्यास सर्व संचालकांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी उपाध्यक्ष प्रा. शंकर साळुंके, संचालक शहाजी पवार, चंद्रकांत किल्लेदार, देवानंद चिलवंत, सिद्राम कोतली, सिद्राम घोडके, सुभाप गायकवाड, रेणुका महागावकर, पुष्पांजली काटीकर, प्रदीप नागणे, शंकरय्या गणेचारी, सतीश लामकाने यांनी विविध सूचना केल्या . अनेकांनी पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री व सहाय्यता निधीला देणगी देण्याचे आवाहन केले. काही संचालकांनी दोन्ही खात्यावर पैसे वर्ग केल्याचे सांगितले. यावेळी आ. सुभाष देशमुख यांनी गरजूंना मदत करण्याचे बँकेमार्फत घरपोच सेवा देण्याचे तसेच सभासदांकडून पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता योजनेमध्ये देणगी देण्याचे आवाहन यांनी केले. बैठकीमध्ये गरजू ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. आभार बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख यांनी मानले .
0 Comments