कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 'प्रिसिजन' कडून एक कोटी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2020

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 'प्रिसिजन' कडून एक कोटी

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी   'प्रिसिजन' कडून एक कोटी




        सोलपूर दि. 1 : कोरोना विषाणू विरुध्दच्या लढयासाठी प्रिसिजन उद्योगसमूहाकडून एक कोटी रुपये मदतनिधी देण्यात आला.

        यातील प्रत्येकी 50 लाख रुपये  पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले जाणार आहेत. प्रिसिजन उद्योगसमूहाचे अध्यक्ष  यतिन शहा यांनी  आज जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, कंपनीचे संचालक तथा मुख्य वित्तीय अधिकारी रवींद्र जोशी, कार्यकारी संचालक करण शहा उपस्थित होते.

        शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेने मदतनिधी दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी प्रिसिजन उद्योगसमूहाचे आभार मानले.

        प्रिसिजन कंपनीकडून आरोग्यक्षेत्रात भरीव काम करण्यात आले आहे. सोलापुरातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात डायलेसिस वॉर्डनिर्मिती, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कर्णबधीरत्वाचे निदान करणारी बेरा टेस्टिंग मशीन, स्थूलपणा सर्जरीशी निगडित बॅरिऍट्रिक मशीन आदी सुविधां उपलब्ध करुन दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages