मोहोळ येथील मंगलमूर्ती तरुण मंडळामार्फत जेवणाचे वाटप करण्यात आले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 3, 2020

मोहोळ येथील मंगलमूर्ती तरुण मंडळामार्फत जेवणाचे वाटप करण्यात आले

मोहोळ येथील मंगलमूर्ती तरुण मंडळामार्फत जेवणाचे वाटप करण्यात आले




मोहोळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील यावली येथे उपासमार होत असलेल्या डोंबारी वस्तीवरील समाजाला मोहोळ येथील मंगलमूर्ती तरुण मंडळामार्फत जेवणाचे चे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय दलित महासंघाचे  संस्थापक  संजीव खिलारे,सामाजिक कार्यकर्ते राहुल तावसकर,अमोल महामुनी ,शितल कोळेकर,देशभूषण कथले ,रोहित तावसकर,सचिन कोळेकर ,केदार बावधनकर ,गणेश गवळी ,लखन बावधनकर,प्रिया पोरे ,नेमिनाथ कोळेकर आदी कार्यकर्ते प्रयत्नशिल आहेत .

सिद्धार्थ नगर परिसरात मोल मजुरी करनारे शहरातील ७० गरजू कुटुंबाला किराणा मालाचे वाटप करण्यात आले. नगरसेवक अण्णा फरतडे यांच्या हस्ते सर्व कुटुंबांना मदत देण्यात आली. यावेळी अमर कसबेकर,अक्षय गायकवाड,सागर पोतदार,बबलू निस्ताने,प्रतीक कसबेकर,लक्ष्मण कांबळे,नागेश फडतरे ,सागर नागटिळक,सौरभ गायकवाड,सुरज कापुरे,हरीश कांबळे,गोट्या बरकडे, गोटू सरवदे,अमित फडतरे,विशाल क्षीरसागर,गणेश उघडे,प्रज्योत कसबेकर,प्रतीक कसबेकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोहोळ येथील ऋणानुबंध सामाजिक संस्था मार्फत रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन  आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ८५ जणांनी आपला सहभाग नोंदविला.यावेळी ऋनानूबंद अध्यक्ष प्रफुल्ल बावकर,उपाध्यक्ष प्रा.भैरवनाथ लाळगे,अमर वागज,राजू उराडे,नगरसेवक सत्यवान देशमुख,आनंद गावडे,विनायक दळवी,चंदुलाल भिवरे,शशिकांत सादिगले,शैलेश गावडे, रविकिरण कोरे,सचिन डोके,डॉ किशोर शिंदे,बाळासाहेब भानवसे,प्रभाकर पवार आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते या रक्तदान शिबिरासाठी संभाजीराव गरड बहुउद्देशीय संस्था व हेडगेवार रक्तपेढीचे सहकार्य लाभले.


रॉबीनहुड संस्थेच्या वतीने शहराच्या बाहेर झोपडीत राहणाऱ्या औषधाचा व्यावसाय करणाऱ्या परिवाराना संसार उपयोगी दुध बिस्कीट , तांदुळ , आटा , अशा वस्तुचे वाटप केले .या वेळी दत्तात्रय लाळगे,हर्षल देशमुख,झुब्बेर झारेकरी,ननु वाघमोडे, विशाल शिंदे यांच्यासह संस्थेचे कार्यकर्तें काम करित आहेत .


    यावेळी ऋनानूबंद अध्यक्ष प्रफुल्ल बावकर,उपाध्यक्ष प्रा.भैरवनाथ लाळगे,अमर वागज,राजू उराडे,नगरसेवक सत्यवान देशमुख,आनंद गावडे,विनायक दळवी,चंदुलाल भिवरे,शशिकांत सादिगले,शैलेश गावडे, रविकिरण कोरे,सचिन डोके,डॉ किशोर शिंदे,बाळासाहेब भानवसे,प्रभाकर परवा आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते या रक्तदान शिबिरासाठी संभाजीराव गरड बहुउद्देशीय संस्था व हेडगेवार रक्तपेढीचे सहकार्य लाभले.

लिटिल बर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक डॉक्टर नसिर खान यांनी कोरोणाच्या पाश्वभुमीवर लॉगडावुन काळात शहर परिसरात वास्तव करनाऱ्या व  पर राज्यातील लॉगडावुन मधे सापडलेल्या माहिला नागरिक व लहाण मुलाना सामाजिक बांधिलकी म्हणुन जिवणावश्यक किराणा मालाचे वाटप करुन सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले आहे.या वेळी त्याच्या समवेत डॉ.वसीम खान ,डॉ. जिलानी खान,संतोष गायकवाड उपस्थित होते .

सध्या जगभरात कोरोना विषाणुने धुमाकुळ घातला आहे.या विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे त्याच पार्श्वभूमीवर पेनूर (ता.मोहोळ) येथे दिग्विजय माने युवा मंचच्या वतीने सोशल डीस्टन्स ठेवत संपूर्ण गावातील ग्रामस्थांना स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी घरोघरी जावुन मास्क व डेटॉल साबणाचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.याप्रसंगी नूतन पोलीस उपनिरीक्षक तुकाराम माने,माजी ग्रा.पं. सदस्य रशीद मुजावर,विकी भोसले,सिद्धेश्वर माने,दिग्विजय माने, विठ्ठल माने,शहाजीराव माने,पप्पू माने,अनिल पवार गौतम पवार,महादेव सावंत,शुभम भंडारे,प्रणव झांबरे,सोमनाथ सावत,भाऊ सावत,नामदेव सावत,विकास क्षिरसागर,अविनाश पाखरे,रोहन पोरे,प्रमोद माने आदीनीं तीन तीन जणांचा ग्रुप करून घरोघरी वाटप करून घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला.
शिवनेरी नर्सरीचे मालक पोपट पंडित भोसले,महेश पंडित भोसले व श्रीरंग लाळे वकील यांनी आज निर्यातक्षम खरबूज ३५ कॅरेट यांचे वाटप मोहोळ येथील नागनाथ महाविद्यालयात,झोपडपट्टी व इतर ठिकाणी वाटप केले.योग्य त्या सुरक्षेचे पालन व नियमांचे पालन करून सदरचे वाटप करण्यात आले.

मोहोळ पोलिस स्टेशन मार्फत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश देशमुख, मुन्ना बाबर, अभिजीत घाटे,सिराज पटेल यांनी मोहोळ व रेल्वे टेशन परिसरामध्ये भाजीपाल्याचे वाटप केले.
याबरोबरच उद्योजक संतोष वायचळ , उद्योजक तन्वीर भाई शेख ,नगरसेवीका अर्चना वायचळ  , नगरसेविका सुर्वर्णा गाढवे , माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर , माजी नगराध्यक्षा वंदना सुरवसे , संतोष गायकवाड , पंकज नागटीळक , शिवनेरी नर्सरीचे मालक पोपट पंडित भोसले , अॅड श्रीरंग लाळे , अजय कुर्डे , मुन्ना बागवान , इमरान बागवान ,आलेश मोरे यांच्यासह अनेक अनेक सामाजिक कार्यकर्ते मदत करत आहेत.

वडाचीवाडी येथे हॉटेल गायत्री व भगवान दाढे परिवाराकडून वाटसरूंसाठी भोजनाची सोय करण्यात आली.अत्यावश्यक सेवेसाठी व अंबुलन्स, पोलीस कर्मचारी,डॉक्टर,सरकारी कर्मचारी तसेच पुण्याहून सोलापूर कडे पायी जाणाऱ्यांसाठी भगवान दाढे यांनी सामाजिक उपक्रम राबविला आहे.

अत्यावश्यक सेवेमधील कर्मचाऱ्यांचा कटिंग व दाढी एक सेवा म्हणून मोहोळ येथील वैभव चौधरी या युवकाने मोफत केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages