Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा तालुक्यातील अकोले (खुर्द) येथे शिवसेनेचे युवा नेते विनोद नंदारम पाटील यांच्या वतीने गोरगरीब कुटुंबांना गहू व तांदूळ असे 30 किंटल धान्य 300 लोकांना मोफत वाटप करण्यात आले

माढा तालुक्यातील अकोले (खुर्द) येथे शिवसेनेचे युवा नेते विनोद नंदारम पाटील यांच्या वतीने गोरगरीब कुटुंबांना गहू व तांदूळ असे 30 किंटल धान्य 300 लोकांना मोफत वाटप करण्यात आले

टेंभूर्णी  :- माढा तालुक्यातील अकोले (खुर्द) येथे शिवसेनेचे युवा नेते विनोद नंदारम पाटील यांच्या वतीने गोरगरीब कुटुंबांना गहू व तांदूळ असे 30 किंटल धान्य 300 लोकांना मोफत वाटप करण्यात आले.  धान्याचे वाटप पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते लेबर फेडरेशनचे अध्यक्ष भारत पाटील व माजी सरपंच नंदराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धान्याचे मोफत वाटप करण्यात आले.

कोरोना या रोगावर मात करण्यासाठी 100% लॉकडाऊन झालेमुळे ज्यांचे हातावर पोट आहे अशा कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचे काम बंद झाले. या कुटुंबाजवळ  पैसा नाही आणि पैसा नसल्यामुळे ते कठीण परिस्थितीतून जात आहेत. अशा कुटुंबाची आभळ व गरज लक्षात घेऊन पाटील यांनी गोरगरीब जनतेला सुरक्षित अंतर ठेवून मोफत धान्य वाटप केले. अन्नधान्य वितरण करताना पुरुष व महिला अशा दोन स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या. 

यावेळी  संभाजी  ब्रिगेटचे माजी तालुका अध्यक्ष      महेश पाटील, रामभाऊ पाटील, उपसरपंच बंडू पाटील, अशोक पाटील, पोलीस पाटील नागेश पाटील, शिवाजी हांडे, दादासाहेब बनसोडे, योगेश महाडिक, अमित पाटील, संतोष मासाळ, प्रल्हाद राऊत, प्रल्हाद मासुळे, तानाजी मासुळे, महादेव मासुळे, बंडू सातव, औइबट पाटील, दिपक पाटील, डीगा पाटील, यश पाटील, काका देवकर, गणेश गिराम, नागनाथ पवार, कोतवाल संदीप बनसोडे इत्यादी उपस्थित होते.
अकोले (खुर्द) येथील रॉयल ग्रुप, जय बजरंग गणेश तरुण मंडळ या कार्यकर्त्यांनी धान्य वाटपासाठी सहकार्य केले
Reactions

Post a Comment

0 Comments