गुळवंची तालुका उत्तर सोलापूर येथे भोगाव येथे राहणार्या वंचित 104 कुठुंबाना गुळवंची शिवसेना शाखेच्या वतीने अन्नधान्याचे वाटप
गुळवंची तालुका उत्तर सोलापूर येथे भोगाव येथे राहणार्या वंचित 104 कुठुंबाना गुळवंची शिवसेना शाखेच्या वतीने अन्नधान्याचे वाटप मार्डी मंडळाचे मंडळ अधिकारी पांडुरंग भडकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सध्या कोरोना पार्श्वभूमीवर सगळीकडे संचार बंदी असल्याने या वंचित कुठुंबाची उपासमार होवू नये यासाठी शिवसेना शाखेच्या वतीने माजी सरपंच सुनिल जाधव यांनी पुढाकार घेवून हा सामाजिक उपक्रम घेतला यावेळी वंचित 104 कुठुंबाना जवळपास 2 क्विंटल अन्नधान्य वाटप करण्यात आले यामध्ये गहु,तांदुळ,ज्वारी,साखर देण्यात आली.या कार्यक्रमा प्रसंगी उपतालुका प्रमुख संजय पौळ, तानाजी भोसले, महेश पांढरे, गणेश शिंदे, चंदन लोहार, सतीश जगताप, आनंत कोरके, प्रशांत पौळ, दत्ता जाधव, युवराज नवगिरे, कृष्णात रुपनर,कृषिकेश शिंदे, संभाजी जाधव आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments