राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाकडून पोलीस कर्मचाऱ्यांना फळे व पाणी बॉटल वाटप
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहेत.अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे आभार व्यक्त करण्याच्या हेतूने व युवक नेते भगीरथ भालके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पंढरपूर शहर राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सचे पालन करीत पोलीस कर्मचाऱ्यांना फळॆ व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.
यावेळी अधिक माहिती देताना राष्ट्रवादी अल्पसंख्यांन्क सेलचे शहराध्यक् ष नासिर बागवान म्हणाले कि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी २३ मार्च पासून संचार बंदीचा अमल सुरु आहे. याकाळात राष्ट्रवादी कॉग्रेस आल्प्ससंख्यांक सेलचे वतीने अन्नदान व इतरही विविध उपक्रम राबविण्यात आले.आज पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी रौफ बागवान,दिलावर बागवान, बशीर बागवान हे उपस्थित होते.
0 Comments